उटगीत डेंगूचा फैलाव
8 दिवसापासून डेंगूचे थैमान : पुन्हा दोन रूग्ण सापडले ; आरोग्य यंत्रणा कुचकामी
उटगी, वार्ताहर :उटगी (ता. जत) येथे डेंग्यूच्या साथीचा फैलाव झाला असून आणखी दोघांना लागण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी लमाणतांडा येथील लक्ष्मण राठोड या वृद्धाचा डेंग्यूने बळी गेला आहे. सध्या डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले असून दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.आठ दिवसात डेंगू आटोक्यात आणण्यात आरोग्य विभाग कमी पडला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.डेंग्यूची लागण झालेले मुस्ताक खानापुरे (वय 31 ) हे सोलापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून गुरनिगाप्पा बिराजदार (वय 25) हे मिरज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याबाबत लेखी पत्र देऊनसुद्धा ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ सुरू आहे.दरम्यान आरोग्य विभाग व ग्रामपंचायती प्रशासन यांनी डेंगूला गांभिर्याने घेतले नसल्याचे साथीचे रुगण वाढले असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे. अजूनही काही रुग्ण उटगीत आहेत.