धाड पडतास बोगस डॉक्टरने ठोकली धूम

0
4

धाड पडतास बोगस डॉक्टरने ठोकली धूम

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता. जत येथील डॉ. सुधिर खाडे यांच्या नावाने सेवासदन दवाखाना सुरू असलेल्या दवाखान्यात यापुर्वी कारवाई झालेला बोगस बंगाली डॉ.प्रोनाथ परिमल मलिक हा उपचार करत असताना जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी.पवार व डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांनी रंगेहाथ पकडले. दवाखान्यातील पाहणी करून औषधा साठ्याचे फोटो घेत असताना डॉ. मलिक यांनी तेथून धूम ठोकली.दरम्यान डॉ. सुधिर खाडे यांच्या नावाने डफळापूरात चालू असलेला दवाखाना सिल केला आहे.

डफळापूर येथे यापुर्वी कारवाई झालेला बगाली बोगस डॉ. मलिक हा पुन्हा रुग्णावर उपचार करत असल्याची तक्रार जिल्हाअधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्याच्या आदेशानुसार शुक्रवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ पवार व डॉ. चोथे यांनी सायकांळी साडेपाचच्या दरम्यान धाड टाकली असता डॉ. मलिक रुग्णावर उपचार करत असल्याचे आढळून आले. दवाखान्यात रुग्ण होते. दवाखान्यात तपासणी करत असताना डॉ. सुधाकर खाडे यांच्या नावाने प्रमाणपत्राची झेराक्स लावली होती. मोठ्या प्रमाणात औषध साठा होता. ते तपासत असताना डॉ. मलिकने पळ काढल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

दरम्यान ज्या नावाने दवाखाना सुरू आहे. त्यांना नोटिस पाठविली आहे. दोन दिवसानंतर दवाखान्याची तपासणी करण्यात येईल. रितसर डॉ. मलिकवर गुन्हा दाखल करण्यात येईल. डॉ. खाडेवरही कारवाई होणार असल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.

डफळापूर येथील डॉ. सुधिर खाडे नावाच्या दवाखान्याला सिल ठोकताना डॉ. पवार, व डॉ. चोथे

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here