जत तहसील कार्यालयातील टेबल पुराण, महिला कर्मचाऱ्याचा बालहट्ट

0

जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालयातील टेबलची मक्तेदारी हा चर्चेचा विषय आहे.कार्यालयातील टेबल अनेक वर्षानंतर बदलण्याचे धाडस नायब तहसीलदार श्री.डि.पी.माळी यांनी बदलण्याचे धाडस दाखविले आहे.मात्र या टेबल बदलात एका महिला कर्मचाऱ्यांने मालदार टेबल न सोडण्याच्या बालहट्टाची सध्या तालुक्यात चर्चेचा विषय आहे.जत तहसील कार्यालयातील लुटीचे अनेक खिस्से सातत्याने समोर येत आहेत.प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय कामे पुढे सरकत नसल्याचे वास्तव आहे.

जत तहसील कार्यालयातील ८५ सेक्शन,कुळकायदा,गौण खनिज,रेकार्ड,पुरवठा अशी मालदार टेबल मिळविण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चढाओढ असते.तहसील कार्यालयातील असे टेबल कर्मचाऱ्याची मक्तेदारी झाली होती.येथे कामासाठी येणाऱ्या दलालांचे स्वागत व्हायचे,तर सामान्य नागरिकांना नागविण्याचे प्रकार घडत होते.या मालगार टेबल असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गेल्या काही दिवसात वाढलेली सुबता बरचं काही सांगून जाते.

काही कर्मचारी दररोज खिसा भरून पैसे घरी घेऊन जात असल्याची चर्चा आहे.येथे दररोज दलालाचा विळखा असतो.या टेबलवर मिळकत मोठी असल्याने साहेबाची मर्जीही या कर्मचाऱ्यावर होती. गेल्या पंधरवड्यात काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने नायब तहसीलदार श्री. माळी यांनी पुढाकार घेत टेबल बदलाचे आदेश काढले आहेत. त्यात बदललेल्या टेबलचा अनेक कर्मचाऱ्यांनी पदभार घेतला आहे.मात्र वरकमाईला सोकावलेल्या एका महिला कर्मचारी मात्र बदललेल्या टेबल घेणार नसल्याचा बालहट्ट करत आहे.विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला गौण खनिज टेबल पाहिजे असल्याची चर्चा सुरू आहे.मात्र अधिकाऱ्यांनी टेबल बदलूनही जर मक्तेदारी सोडविली जात नसेलतर कर्मचारी काय पाटलाच्या मळ्यात कामाला आहेत काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Rate Card

टेबल बदलले जाणार नाहीत

दरम्यान जत तहसील कार्यालयातील टेबल पुराणा संदर्भात प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी तहसील कार्यालयातील टेबल बदलाची प्रक्रिया तेथील अधिकाऱ्यांच्या पातळीवरील विषय आहे. मात्र कोणत्याही प्रकारे झालेली आर्डर बदलण्यात येणार नसल्याचे आवटे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.