जत,संकेत टाइम्स : संख मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजव्या कँनॉलचे १०० टक्के कॉक्रीटीकरण झाल्याशिवाय पाणी सोडू नये अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, संख प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कँनॉलमधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या दोन्ही कँनॉल नादुरूस्त आहेत.अनेक ठिकाणी कँनॉलला लिकेज असल्याने लगतच्या शेतीत पाणी पाझरत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होते आहे.कोणेतही दुरूस्तीचे काम न करता पाटबंधारे विभाकाकडून असे पाणी सोडण्याचे नियोजन लगतच्या शेतकऱ्यांच्या नुकसान करणारे आहे.त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता पाटबंधारे विभागाने प्रांरभी दोन्ही कँनॉलमध्ये कॉक्रीटीकरण केल्याशिवाय पाणी सोडण्यास आमचा विरोध आहे.त्याशिवाय पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
ReplyForward
|