डफळापूर पाणीदार करू ; डॉ.राजेंद्रसिंह राणा | खलाटी,मिरवाड,कुडणूर सह चार गावात जलबिरादरीकडून कामे सुरू

0

डफळापूर, संकेत टाइम्स : जलबिरादरीचे प्रमुख डॉ.राजेंद्रसिंह राणा यांनी डफळापूर ग्रामपंचायतीला भेट दिली.नागरिकांशी संवाद साधला.अग्रणी नदीच्या पाणी स्रोत असलेल्या डफळापूर, खलाटी,मिरवाड,कडणूर या गावात डॉ. राणा यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी कडून पावसाचे पाणी मुरविण्यासाठी काम करण्यात येणार आहे.

या चारी गावांची पाहणी करण्यासाठी जलपुरूष डाॅ.राजेंद्रसिंह राणा,जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष

नरेंद्र चुग, विजय माने, जिल्हा वन अधिकारी रमाकांत कुलकर्णी,जलसाक्षरता केंद्र
अंकुश नारायणकर, जलबिरादरी जिल्हा समन्वयक सागर पाटील आदी डफळापूर येथे आले होते.
त्यावेळी डॉ.राजेंद्रसिह राणा म्हणाले,ज्या गावातील गावकऱ्यांचा‌ सहभाग आहे,तेथे‌ आम्ही काम करतो.डफळापूर पाणीदार बनविण्यासाठी खलाटीपासून काम करावे लागणार आहे.आपल्या गावात पडलेल्या पावसाचे पाणी आपल्याच गावात मुरविण्यासाठी आम्ही काम करत आहोत.कोकळे येथील अग्रणी नदीचे पुर्नजीवन केले आहे.तशाच पध्दतीने या चार गावात जलबिरादरीकडून काम केले जाईल.

मन्सूर खतीब म्हणाले,डफळापूर येथे यापुर्वी मी सभापती असताना वाळूची पोती टाकून पाणी अडविले होते.त्यांचा फायदा लगतच्या कुपनलिका,विहिरींना झाला होता.त्यांची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी शाम वर्धने यांनी डफळापूर येथे बंधारे बांधण्यासाठी 13 कोटीचा निधी दिला होता.या बंधाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही डॉ.राजेंद्रसिंह राणा यांच्या सोबतीने चांगले काम करून गाव पाणीदार करू.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, प्रताप चव्हाण, परशूराम चव्हाण,बि.आर.पाटील,हणमंत कोळी,सुरेंद्र सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
डफळापूर ता.जत येथील बैठकीत बोलताना जलबिरादरीचे प्रमुख डॉ.राजेंद्रसिंह राणा बाजूस मान्यवर
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.