जत,संकेत टाइम्स : उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील जनतेशी उद्धट वर्तन करणारा मग्रुर कर्मचारी सुनिल कवठेकर यांची त्वरीत बदली व्हावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
प्रांताधिकारी कार्यालयातील कवठेकर नामक कर्मचारी अनेक दिवसापासून कार्यालयात ठिय्या मांडून आहे.या कर्मचाऱ्यांकडे अनेक विभागाचा कार्यभार आहे.त्यामुळे त्यांचा तोरा चढलेला असतो.येथे कामासाठी येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांना थेट दमात घेऊन नागरिकांची कवटेकर हेळसाड करत असतो.यामुळे त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.त्यां कर्मचाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे कवटेकरची तात्काळ बदली करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
सुनिल कवठेकर यांची बदली करावी या मागणीचे निवेदन देताना रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व पदाधिकारी