जत : उमदी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संख सह परिसरातील अनेक गावात मटका,जुगार,दारूसह अवैध धंदे पुन्हा जोमात सुरू असून याकडे मात्र पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.संख पोलीस चौकीच्या अंतर्गत संख,अंकलगी,गोधळेवाडी,पाढंरेवा
डी,पाडोंझरी,मोटेवाडी,कागणरी,ति कोंडी,करेवाडी,जाल्याहाळ खुर्द,भिवर्गी,खंडनाळ,आसंगी तुर्क,धुळकरवाडी अशी चौदा गावे येतात.
यातील जवळपास सर्वच गावात मटका,जुगार,बेकायदा दारू,गांज्या,आदी अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत.या बिटच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी पाच लाख रूपयाचे हप्ते गोळा होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पोलीसाचे या धंद्यांना छुपे परवाने आहेत.कोणच कारवाई करत नाहीत.सर्वत्र अवैध धंद्यामुळे तरूण पिठी,बेरोजगार कामगार व शालेय मुले यात बरबटली जात आहेत.अनेक गावात हातभट्टीची दारू पिऊन काही शाळकरी मुलेही डुलत असल्याचे चित्र प्रगत भारताचे दुरभाग्य दर्शवत आहे.
संबंधित बाबीवर नियंत्रण ठेवणे पोलीस मात्र केवळ कर्तव्य बजावत आहेत .अवैध धंद्येवाल्यांच्या “अर्थ ” पुर्ण भेटी घेऊन कोणतीही कारवाई करत नसल्याने सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. महिला वर्गाला विशेष मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.