निवेदनात म्हटले आहे, येथे मोबाईल कंपनीचा बेकायदा टॉवर उभारणीचे काम सुरू आहे.संबधितांना विचारताच ते आम्हाला नगरपरिषदेने एनओसी दिल्याचे सांगतात.मात्र रहवाशी परिसर असताना कोणत्या नियमाने एनओसी दिली यांची चौकशी व्हावी.येथे होणाऱ्या या टेलिफोन टॉवरमधून निघणाऱ्या लहरीमुळे रहिवाशांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे हे काम तात्काळ थांबवून आम्हाला न्याय द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. अशोक पाटील,प्रमोद संकपाळ,राहूल हविनाळ,संदेश कोळी,अमित कोळीसह सुमारे ४० रहिवाशाच्या निवेदनावर सह्या आहेत.