जत : जत तालुक्यात अवैध धंद्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे.जत,उमदी पोलीसाचे आठ कर्मचारी या अवैध धंद्यातील वसुलीच्या नेमणूकीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बेकायदा धंदे बंद होणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जत तालुक्यात अवैध धंदे नविन नाहीत.येथे येणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांने ते बंद व्हावेत म्हणून कधी प्रयत्न केले नाहीत.किंबहुना येथील वसुली कर्मचाऱ्यांच्या फळीने तसे होऊ दिले नाही.परिणामी विनायास बरकत होत असल्याने सर्वांची चुप्पी कायम आहे.तालुक्यात दोन पोलीस ठाणे मुबलक स्टॉप असतानाही तालुक्यात मटका,जुगार,गावटी दारू,गांज्या विक्री,बेकायदा प्रवाशी वाहतूक,वाळू,चंदन तस्करी,घातक हत्यांराची तस्करी राजरोसपणे सुरू आहे.यात पोलीसांना थेट हप्ते पुरविण्यात येत असल्याने ते कोणतीही कारवाई करत नसल्याचे आरोप आहेत.तालुक्यात येणारे प्रत्येक अधिकारी गंडगज पैसा मिळवत आहेत.त्याशिवाय वसूलीच्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची बरकत क्लासवन अधिकाऱ्यापेंक्षा जास्त आहेत.एकदम उमेदीने आलेल्या अधिकाऱ्यांना येथील यंत्रणा काही दिवसात आपल्या तालावर डोलवते.त्यामुळे वसुली कर्मचाऱ्यांची चंगळ सुरु आहे.या सर्व प्रकारामुळे शहरात गुंडाराज बळावले आहे.तेचतेच गुन्हेगार सातत्याने गुन्हे करतात.शहरासह तालुकाभरात दहशतीचे वातावरण आहे. हल्ले करणे,दमकाविणे,दुकाने फोडण्यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत.याला पायबंध घालायचा असेलतर अवैध धंदे बंद करण्याची गरज आहे.
कर्मचारी,काही अधिकाऱ्यांच्या बरकतीची चौकशी करा