माडग्याळमध्ये कोविड योद्ध्यांचा सत्कार | तिरंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम

0

माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ (ता. जत)येथील तिरंगा सार्वजनिक गणेशोत्सव आणि कला,क्रीडा मंडळाने कोवीड योद्ध्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तमाणगोंडा रवी पाटील,सरपंच इराणा जत्ती हे प्रमुख उपस्थित होती.

 

यावेळी कोरोना काळात प्रभावी काम केलेले डॉक्टर्स,पोलीस,ग्रामपंचायत,आरोग्य,महसूल कर्मचारी,आशा वर्कर्स,पत्रकार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपती फोटो देऊन गौरव करण्यात आला.तम्मणगौडा रवीपाटील म्हणाले,जगासह देशात कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला.या कोरोना लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोग्य कर्मचारी,पोलीस , महसूल विभाग,पत्रकार,स्वच्छता  कर्मचारी तसेच जनतेला या महामारी विषयी माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे आशा वर्कर्स या सर्वांच कामाची दखल घेतली पाहिजे . त्यांच्या कामाबद्दल सन्मान केला पाहिजे. शहरासह संपूर्ण देशात गेल्या दीड वर्षापासून पासून कोरोनाने थैमान घातले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत कोरोनाबाधित अनेक रुग्णावर उपचार करून डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून त्यांना जीवनदान दिलेले आहे.   यावेळी विठ्ठल निकम,डॉ.सार्थक हिटी,  युवा नेता कामाण्णा बंडगर,नेताजी खरात,मंडळाचे अध्यक्ष सदाशिव माळी, मंडळाचे सर्व सदस्य,आणि पत्रकार, उपस्थित होते.

 

माडग्याळ : तिरंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.