जतच्या नव्या तहसीलदारांचा पहिला दिवस सत्कारांचा

0

जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालयाचा तब्बल सव्वा महिन्यानंतर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सोमवारी पदभार स्विकारला.जतसह संख अप्पर असा दोन्ही कार्यालयाचा कार्यभार असणाऱ्या नव्या तहसीलदारांचा पहिला दिवस सत्कार स्विकारण्यात गेला.

जतला सव्वा महिना व संखला तब्बल पावने तीन महिन्यापासून तहसीलदार पद रिक्त असल्याने अनेक महत्वाची कामे रखडली आहेत.शासकीय,जमिनीच्या न्यायालयीन तारखा,विविध मंजूरीच्या फाईलचे ढिग अनेक कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पडले आहेत.त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे तहसीलदारांची अनेक दिवसापासून दोन्ही कार्यालयाला प्रतिक्षा होती.प्रांरभी संखचे अप्पर तहसीलदार म्हणून जीवन बनसोडे यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांना जत तहसीलचा कार्यभार अपेक्षित असल्याने त्यांनी संखचा पदभार स्विकारला नव्हता.शनिवारी अखेर नियुक्ती आदेशात अंशत:बदल करून बनसोडे यांची जत तहसीलदार म्हणून नेमणूकीचे‌ आदेश महसूल विभागाकडून काढण्यात आले होते.सोमवारी अखेर बनसोडे यांनी जत तहसीलदार पदाचा पदभार स्विकारला.तब्बल सव्वा महिन्यानंतर आलेले बनसोडे‌ यांच्याकडून सकाळी कार्यभार स्विकारून प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्याची अपेक्षा होती.मात्र दुपारनंतर त्यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर सत्कार स्विकारण्यात त्यांचा वेळ गेला.सायकांळी चारनंतर प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांचा निरोप समारंभ झाला त्यामुळे पहिला दिवस सत्कार समारंभात गेला आहे.आजपासून रखडलेल्या फाईलवर सह्या होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय पुढे ढकलेल्या तारखा,कार्यालयातील ढेपाळलेली यंत्रणा चार्ज करून लोकानुभिमूक कामकाज चालविण्याचे आवाहन तहसीलदार बनसोडे यांच्यासमोर आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.