करजगी,संकेत टाइम्स : करजगी-सोलापूर रस्त्यावर डाळिंब वाहतूक करणारा बुलेरो पिकअप फायबर केबलसाठी पाडलेल्या चरीत घसरल्याने पलटी झाली.त्यात वाहनाचे व डाळिंबाचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने जीवित हानी झाली नाही.सायकांळी साडेपाच वाजता घटना घडली.
अधिक माहिती अशी, या मार्गावर नियम डावलून फायबर केबलसाठी चर खोदण्यात आली आहे.ती व्यवस्थित मुजविलेली नाही.त्यामुळे यात अनेक वाहने घसरून पलटी होत आहेत. दोन दिवसापुर्वी गँस वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला होता.बुधवार (ता.22) सागर यलपले रा.यड्राव ता.मंगळवेढा हा चालक बुलेरो पिकअप टेम्पो एमएच १३,सीयू ४१८३ मधून डाळिंब भरून करजगी-सोलापूर रस्त्यावर निघाला होता.
करजगी गावाजवळ रस्त्याला लागून पाडलेल्या चरीत पिकअप टेम्पो घसरल्याने पलटी झाला,त्यात आतील डांळिबासह पिकअप टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे फायबर केबल कंपन्यांनी तालुकाभर चांगल्या रस्त्याचे वाटोळे केले असून याकडे कोनही लक्ष देत नसल्याने वाहन धारकांना फटका बसत आहे.
करजगी – फायबर केबलसाठी काढलेल्या चरी पिकअप टेम्पो घसरल्याने पलटी झाला.