माजी सैनिकांचे कर्तृत्त्व समाजासाठी प्रेरणादायी | आमदार विक्रमसिंह सांवत ; सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार

0
जत,संकेत टाइम्स : जत येथे एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन जत,व तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या तालुक्यातील सैनिकांचा सत्कार आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आला.  आवंढीचे सेवानिवृत्त सुभेदार मेजर रावसाहेब लक्ष्मण मरगळे,सोरडीचे नाईक सुभेदार तुकाराम शिवाजी गायकवाड,येळवीचे हवालदार बाबासाहेब रावसाहेब जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला.आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले,माजी सैनिकांचे कर्तृत्त्व समाजासाठी प्रेरणादायी असून ते समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करतात. प्रत्येक नागरिकासाठी माजी सैनिक आदर्श आहेत.
तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी माझे‌ सतत प्रयत्न असतात.माजी सैनिकासाठी मार्केट यार्डात दोन गुंठे जागादेखील उपलब्ध करुन दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
संघटनेचे अध्यक्ष दत्ता शिंदे म्हणाले की, या अगोदर माजी सैनिक कल्याण संघटना रजिस्टर नंबर एफ 1983 ही संघटना कार्यरत होती,परंतू काही कारणास्तव ती 2002 साली बंद झाली. त्यानंतर सुभेदार सुभेदार मेजर ऑ. कॅप्टन बबनराव कोळी आवंढी, हवालदार दत्ता शिंदे जत,हवालदार महेश जगताप,कॅप्टन कुरणे, सुभेदार मेजर बिसले यांनी ऑगस्टमध्ये सर्व माजी सैनिक एकत्र घेऊन त्याच संघटनेत थोडा बदल करून व नवीन पदाधिकारी निवड करून ही संघटना पुनरजीवित केली आहे.उपाध्यक्ष बबन कोळी यांनी संघटनेची ध्येय धोरणे व उद्दिष्ट याविषयी माहिती दिली.
यावेळी जि.प.सदस्य सरदार पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.माजी सभापती बाबासाहेब कोडग,काँन्ट्रक्टर राम पवार,पंचायत समितीचे माजी सदस्य माळी व तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन आवंढीचे माजी उपसरपंच डॉ.प्रदिप कोडग यांनी तर आभार दत्ता शिदें यांनी केले.
जत येथील कार्यक्रमात आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.