हॉटेल व्यवसायिकांची आजाराला कंटाळून आत्महत्या

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील निलसागर लॉज नजिक राहणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांने आजाराला कंटाळून साडीने गळपास लावून आत्महत्या केली.शेरखान गुलाब मुल्ला (वय ५५)असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकांचे नाव आहे. घटना बुधवारी दुपारी २.०० च्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी,शेरखान मुल्ला हे जत बसस्थानका बाहेर रात्री उशिरापर्यत गाडा लावून हॉटेल व्यवसाय करत होते.गेल्या काही दिवसात त्यांना मधुमेह आजाराने पछाडले होते.काही दिवसापुर्वी जखमा बऱ्या होत नसल्याने त्यांच्यावर शस्ञक्रिया करण्यात आली होती. तरीही जखमा बऱ्या होत नसल्याने ते मानसिक दबावात होते.
Rate Card
त्यात घर चालविण्याची जबाबदारी यामुळे त्यांना नैराश्य आले होते.त्यातून त्यांनी बुधवारी दुपारी घरात कोन नसल्याचे पाहत साडीने गळपास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.