नोंदणी व मुद्रांक विभागाचा बेमुदत संप मागे | जिल्हाध्यक्ष सुनिल पाथरवट यांची माहिती

0
जत,‌संकेत टाइम्स : नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिनांक २१ सप्टेंबर पासून सुरू केलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे अशी माहीती नोंदणी व मुद्रांक विभाग  अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष व जतचे दुय्यम निबंधक श्री. सुनिल पाथरवट यानी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. 
    त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यानी दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पासून बेमुदत संप पुकारला होता.तरी सदर संपातून सांगली जिल्ह्यातील अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यानी आज दिनांक २२ सप्टेंबर२०२१ रोजी सदर संपातून माघार घेतलेली आहे. दिनांक २२सप्टेंबर पासून सांगली जिल्ह्यातील सर्वच अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी हे कामावर हजर राहातील अशी माहीती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाथरवट यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.