माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चे विविध मागण्यासाठी 24 सप्टेंबरला धरणे आंदोलन 

0
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक शासनाकडून अद्याप करण्यात आलेली नाही तसेच कोरोना काळात शैक्षणिक कामकाजही ऑनलाइन वगळता ठप्प झालेले आहे.  अजून ही शंभर टक्के शाळा सुरू झालेल्या नाहीत. covid-19 च्या जोडीला राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटनांना आपल्या काही निर्णयाचे धक्के देण्याचे वृत्त बेमालूमपणे सुरू ठेवलेले दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी,  शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत, सांगली जिल्हा परिषद सांगली.माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर, धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती,अशी माहिती सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांनी दिली आहे.
धरणे आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन )  अध्यक्ष, ज्ञानेश्वर कानडे सर करणार आहेत. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील covid-19 संक्रमित दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय आर्थिक लाभ व अनुकंपा योजनेखाली कायम नोकरी देण्यात यावी,’कोरोना योद्धा’ म्हणून कार्यरत/ कार्य केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर यांच्या”सेवेची नोंद त्यांच्या  सेवा- पुस्तिकेत करावी.
तसेच नियमानुसार देय ‘बदली रजा’मंजूर करण्यात यावी.,राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन 2019/ अंशदायी परिभाषित निवृत्तीवेतन ऐवजी भविष्यनिर्वाह व सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात यावी.1 नोव्हेंबर 2005 पासून त्यांचे खात्यावरील जमा रक्कम प्रो.फंड खाते काढून त्यामध्ये आरंभिची शिल्लक म्हणून वर्ग करण्यात यावी.अनुदानासाठी अघोषित शाळा/ तुकड्या यांना अनुदान मंजूर करावे व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी.डी.सी.पी.एस. व एन.पी.एस.धारक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या खात्याचा हिशेब मिळणेबाबत व शासनाने केलेल्या गुंतवणुकीची माहिती मिळावी.प्रस्तावित संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव दुरुस्त करून मिळावी.वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी तसेच थकित वेतन बिले व सातवा वेतन आयोग पहिला / दुसरा हप्ता यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.संस्थेत वाद असलेल्या ठिकाणी किंवा संस्था मुख्याध्यापक नियुक्तीस टाळाटाळ करीत असल्यास सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक नियुक्तीचे अधिकार माननीय शिक्षणाधिकारी यांना देऊन व आशा संस्थांवर प्रशासक नियुक्ती करण्यात यावी.कार्यभारानुसार कला व क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात.
शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय प्रतिपूर्ती साठी ” स्वाईनफ्ल्यू , डेंग्यू,  चिकनगुनिया व पोस्ट covid-19 ” अंतर्गत आजारांचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत करावी.शिक्षक-शिक्षकेतर यांच्या नियुक्तीबाबत संच मान्यतेच्या निकषांमध्ये ( दिनांक 13 जुलै 2020 व दिनांक 4 डिसेंबर 2020 ) जाचकता  कमी करून सकारात्मक सुलभ अंमलबजावणी करावी.प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथालय पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथील करावी.प्रशिक्षणाबाबत हमीपत्र घेऊन वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळावा तसेच शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी मिळणेबाबत तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करावी.
इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेस जोडण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे,बी. एल. ओ.  च्या कामासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या न करण्यात यावी.पवित्र प्रणाली मार्फत नियुक्ती करतांना सेवेत कार्यरत असलेल्या अर्धवेळ शिक्षक /कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळण्यासाठी पवित्र-प्रणाली मध्ये तरतूद करण्यात यावी. केंद्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांची समिती नियुक्ती करण्यात यावी.त्यात 1936 पासून राज्यात कार्यरत असलेल्या ” महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन )” या संघटनेस प्रतिनिधित्व देण्यात यावे. इत्यादी मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात येणार आहेत.
या मागण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन) यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने ( फेडरेशन )  शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी वेळ दुपारी 12 ते 3 या वेळेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सांगली. जिल्हा परिषद सांगली यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.तरी जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान, हाजीसाहेब मुजावर यांनी केले आहे.सचिव बळीराम कसबे,उपाध्यक्ष वैभव माने, अरविंद मेनगुदले, कोषाध्यक्ष नामदेव कांबळे, सहसचिव बायाक्का पाटील,नम्रता सूर्यवंशी, शंकर व्हनमाने, बाळासाहेब बारगिर, रमेश माने,संदीप रोकडे,आमीन शेख,वसंत सलगर, मंगेश माने,चंद्रकांत ऐवळे, अभिजीत आठवले,विजय कुमार सुतार, पंडित कुलकर्णी, दीपक कदम, विजय सरवदे,लक्ष्मण सकटे,सल्लागार  कुमार होवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.