बेसुमार वाळू तस्करींचा बदोबंस्त करणार कोन.? | तलावे,नदी,ओढापात्रे बोडके : अधिकाऱ्याच्या दालनापर्यत तस्करांचा वावर

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील भोर नदीसह कुडणूर, डोण,व तालुक्यातील अनेक वडापात्रातून बेसुमार वाळू तस्करी सुरू आहे.बेबंद वाळू तस्करी नदी,ओढे बोडकी करणाऱ्या वाळू तस्कर व त्याला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोन करणार कारवाई असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी यांनी कठोर निर्णय घेतला नसल्याने कारवाई थंडावली आहे.प्रांताधिकारी अजून हजर झालेले नाहीत.संखचे तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.जतला नवे तहसीलदार लाभले  आहेत,त्यांच्याकडून अद्याप वाळू तस्करी रोकण्याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.त्यामुळे बेधडक दररोज सुमारे पन्नासवर गाड्या वाळू जत शहरासह तालुक्यातील अनेक गावात ओतली जात आहे. अनेक गावातील मोठाले वाळूचे ढिग मंडल अधिकारी, तलाठी,कोतवाल व दक्षता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या नजरेस पडत नाहीत हे विशेष आहे.आता सर्वच अलबेल असल्याने अगदी दिवसाढवळ्या संख अप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरातून वाळू भरलेल्या गाड्या जत शहर आजूबाजूच्या गावात ओतल्या जात आहेत.

जत तालुक्यात सगळेच अवैध धंदे तेजीत आहेत. या सगळ्या पिलावळींना राजकीय पाठबळ आहे. प्रशासनातील अधिकारी वर्गही या लोकांच्या साखळीत सामिल आहे. सगळे दोन नंबर धंदेवाले, नेते, पोलिस, प्रशासनातील अधिकारी व सगळ्यांची चांडाळ पंचोडी तयार झाली आहे. सगळे कसे हातात हात घालून “आपण सारे भाऊ भाऊ, येणारी भाड मिळून खाऊ” हे गीत आळवत आहेत. या चांडाळांच्या पंचोडीने तालुकाभर उच्छाद मांडला आहे. दोन नंबरच्या धंद्यातून बरकत आलेली ही बांडगुळं राजकारणाचा मार्ग प्रशस्त करत आहेत. नेत्यांच्या मागेपुढे करून त्यांना निवडणूक फंडही पुरवत आहेत. अलिकडे स्वत:च राजकारणात उतरून निवडणूका लढवत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला अडवणार कोण ? काही पत्रकारांनी याविरूध्द आवाज उठवला, बातम्या दिल्या तर फारसा फरक पडत नाही. तेवढ्यापुरते कारवाई केल्याचे नाटक होते किंवा बातमीला कोलून या लोकांचा उच्छाद तसाच सुरू राहतो. या दोन नंबरींच्या मागे नेते मंडळींचा कृपाशिर्वाद आहेच. पण बर्याच ठिकाणी स्वत: नेत्यांचेच हे धंदे आहेत. त्यांनी ठेवलेली पाळीव पिलावळ हे उद्योग सांभाळत असते. बाकी पोलिस व प्रशासन व्यवस्था या लोकांच्या रखेलीसारखी त्यांच्या सेवेत राबत असते. तालुक्यातीलही महसूल यंत्रणेला हाताशी धरून सुरू आहे. जत तालुक्यातील वाळूचे कोठार असणाऱ्या मुंचडी पासून सुरू होणाऱ्या कोरडा नदी पात्रात वाळेखिंडी ते सिंगनहळ्ळी पर्यत व भोर नदीपात्रात संख- सोनलगी येथ पर्यतच्या महाराष्ट्र हद्दीत वाळू तस्करानी उच्चांद मांडला आहे.त्यांच्या वाळू तस्करीने आड येणारे परिसरातील शेतकरी भयभीत आहे.दहशतीने विरोध मोडून काढून वाळू तस्करी सुरुच आहे. त्यामुळे संख मध्यम प्रकल्प, भोर नदी बोडकी बनत आहे.बोटावर मोजण्याऐवढ्या वाळू तस्कर व अधिकाऱ्यांच्या हितासाठी हे पाप केले जात आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.