आरोग्य विभागाने रद्द केलेल्या परीक्षाचे पैसे परत द्यावेत ; विकास साबळे          

0
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची महाभरतीची परिक्षा भर्तीसाठी नेमलेल्या कंपनीच्या चुकीमुळे अचानक रद्द केल्याने सुमारे आठ लाख ६६ हजार उमदेवारांना यांचा फटका बसला असून यात उमेदवारांचे आर्थिक नुकसान तर झालेच त्याशिवाय वेळ व मनस्ताप सोसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने या उमेदवारांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
ते म्हणाले,राज्यात कोरोनाच्या उद्रेकानंतर प्रथमच आरोग्य विभागाची एवढी मोठी पदे भरण्याची जाहिरात निघाल्याने राज्य भरातील आठ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांनी भर्तीसाठी अर्ज केले होते.
या‌विभागाकडील क व ड वर्गातील सुमारे ६२०० जागेसाठी दिनांक २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा ठेवण्यात आली होती.ही परिक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने न्यासा कम्युनिकेशन कंपनीला नियुक्त केले होते,कंपनीच्या चुकीमुळे ७० हजार उमेदवारांना हॉल तिकीट मिळाले नाही.अचानक
परीक्षा केंद्रात आदलाबदल झाले,यावर कडी म्हणून की काय काही उमेदवारांना महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील परीक्षा केंद्र मिळाले अशा पद्धतीची त्यांना हॉल तिकीट मिळाले,अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रे गाठली होती.त्यातच कंपनीने हा गोंधळ झाल्याचे सरकारच्या लक्षात आणून देताच परिक्षेच्या आदल्या दिवशी परिक्षा रद्द केल्याचा मँसेज तोही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आला.त्यावेळी अनेकजण केंद्राच्या ठिकाणी तर काही जण प्रवासात असताना परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.त्यात आर्थिक नुकसान,मानसिक त्रास झाला आहे.त्यामुळे शासनाने ही जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांना परिक्षा फी व प्रवास खर्च द्यावा,अन्यथा‌ रिपाइंकडून तीव्र आंदोलन करू असा इशाराही साबळे यांनी दिला आहे.
Rate Card
इतर राज्यांनी काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला टेंडर दिले
आरोग्य विभागातील मोठी रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्याची पूर्ण जबाबदारी आरोग्य विभागाकडून न्यासा कम्युनिकेशन कंपनीला देण्यात आली होती.बेजबाबदारपणे काम करणाऱ्या न्यासा कंपनीला भारतातील अनेक राज्याने काळ्या यादीत टाकले आहे.त्या कंपनीला अनेक राज्ये नोकरभरतीची कोणीही टेंडर देत नसतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने याच कंपनीला जबाबदारीचे काम दिले.त्यांनी गंभीर चुका करून महाराष्ट्रातील मुलांचे नुकसान केले आहे,यांची चौकशी व्हावी,अशी मागणीही साबळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.