जत तालुक्याचा पाणी प्रश्नासाठी ताकतीने लढू ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील | कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी.पाटील यांचा सत्कार

0
Rate Card

 

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मागे ताकत लावून संपूर्ण तालुका पाणीमय करू,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
जत तालुका कॉग्रेसच्या वतीने संख येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक वाघमोडे,अरूण साळे,पांडोझरी उपसंरपच नामदेव पुजारी,कुलाळवाडीचे संरपच,उपसंरपच,सदस्यासह अनेकांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमदार एम.बी. पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार, विक्रमसिंह सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विशाल पाटील, कर्नाटकचे माजी आमदार जी. टी.पाटील, तमन्ना हंगरगी, सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जत तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, जि.प.सदस्य महादेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील पुढे‌ म्हणाले, जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने पाहत असून येत्या काळामध्ये जत तालुक्याच्या पाणी प्रश्न नक्की सोडविला जाईल,यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे ना.पाटील यांनी स्वागत केले. जो विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, तो विश्वास सार्थ ठरविणे ही आमची जबाबदारी आहे.काही महिन्यांपासून आपले शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मात्र, पंतप्रधान यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. या शेतकरी विरोधी कायद्यांचा आपण सर्वांनी जमेल तसा विरोध केला पाहिजे.

उद्या सोमवार दिनांक, दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ना.पाटील यांनी केले.
माजी मंत्री एम.बी.पाटील म्हणाले,जत तालुक्यातील पुर्व भागातील गावांना माणूसकीच्या नात्याने तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले आहे.अशाच पध्दतीने उन्हाळ्यात महाराष्ट्रातून तीन टिएमसी पाणी कर्नाटकात सोडावे त्यातून अडीच टिएमसीपर्यत पाणी कर्नाटकात पोहचेल,तेच पाणी या योजनेतून जतला माणूसकीच्या नात्याने सोडू,असेही आश्वासन पाटील यांनी दिले.

मंत्री विश्वजीत कदम म्हणाले,गेल्या चाळीस वर्षापासून आमचा जत तालुका पाण्यासाठी टाहो फोडत आहे.या तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी स्व.पंतगराव कदम यांनी जलसंपदा विभाग,जिल्हा नियोजन मधून निधी दिला.तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळावे म्हणून आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सातत्याने संघर्ष केला.त्याचे फलित झाले असून त्या योजनेतून जत तालुक्यात पाणी आल्याचे समाधान आहे.त्या योजनेसाठी कष्ठ घेतलेले कर्नाटकचे माजी मंत्री आ.एम.बी.पाटील यांचा सत्कार करण्यासाठी इतकी लोक जमली आहेत.सामाजिक न्याय विभागाकडून जत तालुक्यातील समाज बांधवासाठी दोन कोटीचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.सगळे मिळून प्रयत्न करत जत तालुका दुष्काळमुक्त करू,असा विश्वास ना.कदम यांनी व्यक्त केला.भाजपाच्या नेतृत्व त्यांची माणसे भाड्याने देत आहेत.त्याचे भाडे परवडणार का हा विषय आहे,ते कधीही आपल्या मालकांकडे जाऊ शकतात.आम्ही कर्नाटक-महाराष्ट्र एकत्रित काम करू,आमदार विक्रमसिंह सांवत यांना यापुढे ताकत देऊ,चांगली माणसे पक्षात घेऊन सर्वत्र सत्ता आणू असेही ना.कदम म्हणाले.

विशाल पाटील म्हणाले,एम.बी.पाटील यांच्या मनात जत तालुक्यातील जनतेची तळमळ दिसत आहेत.त्यामुळे ते या भागाला पाणी देण्यासाठी पुढाकार घेतात.जत तालुक्यातून ९ जिल्हा परिषद सदस्य आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या माध्यमातून निवडून आणू,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले,जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे,यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे,मला या जनतेने विधानसभेत पाठविले आहे.जत तालुक्याला ६ टिएमसी पाणी उपलब्ध केले आहेत.त्याबद्दल शंकाकुशंका आहेत.म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात फक्त ९ टक्के भागात आले आहे.त्यासाठी आम्हाला ४०-४२ वर्षे लागली आहेत.या योजनेसाठी भाजपाकडून काहीही निधी आलेला नाही.आमचे खासदार प्रतिक पाटील यांच्यामुळे म्हैसाळला निधी मिळाला होता.आमची नियोजित विस्तारित योजना पुर्ण करा,मात्र त्यासाठी आमची आणखीन एक पिढी जाऊ नये, गतीने मंजूरी देण्यासाठी प्रयत्न करावेत. कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पावसाळ्यात पाणी आल्याने सात तलाव भरण्यात आले आहेत.कर्नाटकातून सोडलेले पाणी येत्या काही दिवसात सोनलगी पर्यत पोहचेल.मला जतचा शेतकरी सुखी झालेला पाह्याचे आहे.त्यासाठी मी पुर्ण क्षमतेने येणाऱ्या काळात काम करीन.जिल्हा परिषद,पंचायत समितीवर कॉग्रेसचा झेंडा लावणार हे निश्चित आहे.

संख,ता.जत येथील कॉग्रेसच्या कार्यक्रमात कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी.पाटील,ना.सतेज पाटील,विश्वजीत कदम,आ.विक्रमसिंह सांवत यांचा धनगरी घोंगडी घालून सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.