काय‌ करतायतं पोलीस,आठवड्यात चौथी चोरी | उटगीत चार दुकाने फोडली

0
9
जत,संकेत टाइम्स :  उटगी (ता. जत) येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकान, बेकरी, हॉटेल आणि पानशॉप अशी चार दुकाने फोडून चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला.ही घटना शुक्रवारी मध्यरात्री झाली. तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू असून खळबळ उडाली आहे.तालुक्यात आठवड्यात चौथी चोरी झाल्याने नेमके जत उमदीचे पोलीस काय करतात,असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी: उमदी ते जत राज्य मार्गालगत उटगी बस थांबा परिसरात रविंद्र कोळी यांचे मोबाईल दुकान चोरट्यांनी शटर उचकटून फोडले. दुकानांतील सीसीटीव्ही संच ,संगणक,लॅपटॉप अँड्रॉईड मोबाईल, दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दिलेले ५० मोबाईल असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. शाकिर मुल्ला यांचे पान शॉप फोडून तंबाखू ,सिगारेट चोरली आहे. खुतबुद्दीन मुल्ला यांचे हॉटेल फोडून तेलाची पाकिटे आणि इतर साहित्य लंपास केले,शांतप्पा लिगाडे यांचे बेकरी दुकान फोडून खाद्यपदार्थ पळवले आहेत. या चोऱ्यांचा तपास उमदी पोलिस करीत आहेत.जत शहरात बँकेतून काढलेले पैसे पाळत ठेवून भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी पळवले. अशा दोन घटनांत साडेचार लाख रुपये लंपास केले. पूर्वभागातील संख येथे चार दिवसांपूर्वी टायर दुकान फोडून मुद्देमाल लंपास करण्यात आला.सोन्याळ येथेही काही दिवसांपूर्वी चोरी
झाली होती. एकंदरीत चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. पोलिसांना अद्याप एकाही चोरीतील चोरटे सापडलेले नाहीत.
उटगी स्टँडसमोरील चोरट्याने फोडलेले दुकान
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here