संखमध्ये कॉग्रेसचा तूफान मेळावा | जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकीचे रणशिंग फुंकले ; अनेकांचा प्रवेश

0
जत,संकेत टाइम्स : कॉग्रेसच्या वतीने संख येथे घेण्यात आलेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याला तुफान प्रतिसाद‌ लाभला.आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वावर आजही जनतेचा विश्वास असल्याचे पुन्हा सिध्द झाले.कर्नाटकचे माजी मंत्री मा. एम. बी. पाटील,कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील, कृषिराज्यमंत्री ना.विश्वजित कदम, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विशाल पाटील, माजी आमदार जे. टी. पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज जी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात कॉग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समितीसह मार्केट कमिटी निवडणूकीचे रणसिंग फुंकले आहे.
या मेळाव्यामुळे पुन्हा कॉग्रेसचे कार्यकर्त्यात नवी ऊर्जा संचारली आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर संखमध्येच कॉग्रेसकडून मेळावा घेत‌ जंगी शक्ती प्रदर्शन घेत आम्हीही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळाने झालेल्या या मेळाव्यात पुर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संख ग्रामपंचायतीचा परिसर नागरिकांच्या उपस्थितीने भरला होता.इमारत,गेट बाहेर कुठे जागा मिळेल तेथे नागरिक मान्यवराची भाषणे ऐकण्यासाठी उभे होते.
गेली अनेक वर्षे जत तालुका दुष्काळाचा सामना करत आहे. जवळपास २ पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत राहिल्या. काही भागात म्हैशाळ पाणी योजना आली आहे. तिच्या विस्तारासाठी हि मंजुरी मिळाली आहे पण ती पूर्णत्वास जाऊन पाणी मिळण्यास आणखी काही वर्षे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथून सहजा सहजी पाणी उपलब्ध होईल तिथून जत तालुक्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. कर्नाटक राज्याची तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी ओव्हरफ्लोव होऊन ते पाणी नैसर्गिकरित्या तिकोंडी, संख यासारखे तलाव भरून जत पूर्व भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जत तालुक्याला त्यांच्या हक्काचं पाणी देण्यासाठी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून अग्रेसर राहिला आहे.जत तालुक्यातील पूर्वेकडील 65 गावांना कर्नाटकच्या तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळवून देण्यासाठी कर्नाटकचे माजी जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील  सहकार्याने प्रयत्न करीत आहे. येणाऱ्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वसन सतेज उर्फ बंटी पाटील व कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम दिले आहे.
जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने पाहत असून येत्या काळामध्ये जत तालुक्याच्या पाणी प्रश्न नक्की सोडविला जाईल, हा मला विश्वास आहे. जत तालुक्यातील विकास कामासाठी २ कोटी रुपये तातडीने मंजूर करू,असे आश्वसन विश्वजित कदम यांनी दिले आहे. आम्ही सर्व सोबतीने लढून जतला पाणी मिळवून देण्यासाठी रात्र दिवस मेहनत करू,असे या मेळाव्यात कॉग्रेस नेत्यांनी केलेली घोषणा येत्या काळात कॉग्रेसला बळकटी देणार हे‌ निश्चित झाले आहे.
संख ता.जत येथील मेळाव्यास जमलेला प्रचंड जनसमुदाय , या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांचे कॉग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.