फार्मासिस्ट दिनानिमित्त सॅनिटाईजर, मास्कचे वाटप

0
वळसंग : जत येथील प्रदीप टिळे यांच्या इंटेन्स केअर मेडीकल व वळसंग येथील शिवराज मोटे यांच्या लाईफलाईन मेडीकल मार्फ़त फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने वळसंग मधील माध्यमिक व प्राथमिक शाळांना सॅनिटाईजर व मास्कचे वाटप करण्यात आले.कोविड काळात आरोग्याचे भान राखणे गरजेचे असते म्हणून या दोन्ही मेडिकल मालकाने एकत्रित येऊन शाळा व त्याच्या पटसंख्येनुसार सदर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मेडिकलचे मालक प्रदीप टिळे व शिवराज मोटे, प्रवीण जाधव, सुनील शिवशरण, प्रतीक चव्हाण, महादेव बजंत्री, सुशांत चव्हाण व शाळेचा स्टाफ उपस्थित होता.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.