जतेत पुन्हा चोरीची घटना,दीड लाख लंपास

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरात पुन्हा चोरीची घटना घडली. मंगळवारी आठवडा बाजार दिवशी एका नागरिकांचे बँकेतून काढलेले दिड लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले आहे.तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.जत शहरातील हा तिसरा प्रकार घडला आहे.याप्रकरणी जत पोलीसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

अधिक माहिती अशी, जत शहरातील उमराणी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र ही चोरट्यांना मृगजळ ठरले आहे.एका बाजूने शहराबाहेर जाणारा उमराणी रोड,तर दुसऱ्या बाजूला गर्दीने फुललेला मुख्य बाजार पेठेत जाणारा रस्ता यामुळे बँकेतून पैसे काढून येणाऱ्या वर पाळत ठेवून चोरटे या पैसे हातोहात लंपास करत आहेत.

 

तीन गंभीर घटना घडूनही जतचे पोलीस अद्यापपर्यत सतर्क झालेले नाहीत.विशेष म्हणजे जत पोलीसांना या अगोदरच्या दोन्ही घटनेचा तपास चोरटे सीसीटिव्हीत कैद होऊनही पकडण्यात अपयश आले आहे.यामुळे चोरटे आणखीन बळकट झाले आहेत. त्यामुळे दररोज चोरटे बँकेसमोर टेहाळणी करत बसत असल्याचे समोर येत आहे. तिन्ही घटनेत चोरट्यांचा पेहराव,शरीरयष्ठी एकसारखी असल्याचे समजते.मात्र चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.
Rate Card
बँकेचा हालगर्जीपणा
बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या समोर तीन वेळा अशा घटना घडुनही बँकेच्या व्यवस्थापनाला गांर्भिर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.बँकेने खरेतर बँकेबाहेरील आतापर्यत आपले सीसीटिव्ही सुसज्ज करण्याची गरज होती.मात्र कसे काहीही न झाल्याने त्या सीसीटिव्हीतील चित्रण अंधूक झाल्याने तपासाला मर्यादा पडत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.