सुंदर माझे कार्यालय अभियान जतेत अमल कधी | तहसील कार्यालयाला भोवती विद्रुपीकरण ; पार्किंगचा फज्जा
जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालयातील पार्किंगचा बोजवारा उडाला असून तहसील कार्यालयात चालत जाता येत नाही इतक्या दुचाकी गोडावूनच्या बाहेर असलेल्या परिसरात अस्तावेस्त लावल्या जातात.या गाड्या लावण्याचा फटका खुद्द नवे तहसीलदार जीवन बनसोडे यांनाही बसला आहे. त्यांचे चारचाकी वाहन कार्यालया बाहेर काढताना चालकांला अगोदर खाली दुचाकी बाजूला काढाव्या लागत आहेत.
तहसील कार्यालयाच्या गेटला ठेचून अतिक्रमणेजत तहसील कार्यालयाच्या गेटला ठेचून चहा गाडे चालकांनी अतिक्रमणे केली आहेत.तर अन्य खोकी थेट रस्त्यावर थाटण्यात आली आहेत.एकीकडे शासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी दिवसाचा किमान 1/3 कालावधी कार्यालयात व्यतित करतो. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यास त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा फायदा निश्चितपणे प्रशासनास व सामान्य जनतेस होतो. यामुळे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान बनण्यास मदत होते. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालय हे स्वच्छ, सुंदर व नीटनेटके असावे तसेच तेथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी केले आहे,त्याचा जतेत अमल कधी होणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
