वाळू,मुरूमाची दिवसाढवळ्या चोरी | तालुकाभर रोजरोसपणे तस्कर सक्रीय ; गौण खनिजासाठी समेट झाला काय ? 

0
3

जत : गौण खनिज चोरट्यांनी आता तालुक्यातील गावागावातील माळरानाला टार्गेट केले असून अनेकांनी चक्क माळराने पोखरून वीस फुटापर्यत खड्डे पाडले आहेत. जत तालुक्यातील विविध गावातील घाटात असे मोठमोठ्ठाले खड्डे दिसत आहे. शासनाची रॉयल्टी बुडवित खुलेआम गौण खनिजाची चोरी सुरू आहे.नव्याने आलेले तहसीलदार गौण खनिज वाहतूकीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आहेत. यामुळे वाळू,मुरूम,दगडाची राजरोस रॉयटी न भरताच चोरी सुरू आहे.

जत तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध गौण खनिज तस्करीचा व्यवसाय फोफावला आहे. या व्यवसायात अनेक जण गुंतले आहे. महसूल व वनविभागाच्या हद्दीत गौण खनिजाचे बिधनास्तपणे उत्खनन केले जात आहे. तालुक्यातील पोखरलेले माळरान सध्या डोळ्याने दिसतात. मात्र हा प्रकार महसूलच्या अधिकार्‍यांना दिसू नये हाच संशोधनाचा विषय आहे. तालुक्यातील अनेक मार्गावरील घाटातही मोठमोठ्ठाले खड्डे दिसून येतात. यामुळे या रस्त्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. 
खड्डीसाठी दगड, मुरुम मोठय़ा प्रमाणात खोदला जात आहे. विशेष म्हणजे गौण खनिजाच्या उत्खननासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. रॉयल्टी भरुन उत्खनन करावे लागते. परंतु अत्यल्प रॉयल्टी भरुन मोठय़ा प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जात आहे. अनेकदा बनावट पावत्यांवरही गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. या व्यवसायात अनेक जण गब्बर झाले आहे. विशेष म्हणजे गौण खनिज चोरी करणार्‍या कंत्राटदारांमध्ये चांगलीच चढाओढ असते. 

जतेत गौण खनिजसाठी समेट
जत तालुक्यात गौण खनिज (वाळू,मुरूम,दगड)यांचे मोठे पैसे मिळविण्याचे जुगाड आहे.तालुक्यातील या मिळकतीला येणारा प्रत्येक अधिकारी कठोडा घेऊन तयार असतो.आताही या तस्करीच्या गौण खनिज उद्योगासाठी समेट घडल्याची चर्चा आहे.काही मंडल अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचेही समजते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here