आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यापेनचे वाटप

0
डफळापूर : भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंकले ता.जत येथील श्री. सिध्दनाथ विद्यामंदिर आणि संजय दुधाळ ज्युनियर काँलेज येथे विद्यार्थ्यानां भाऊसाहेब दुधाळ यांच्या उपस्थितीत वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी वाढदिवस साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवून समाजाला मदत होईल असे कार्यक्रम राबवा असे आवाहन केले होते.

 

त्यानुसार जत पश्चिम भागातील त्यांचे समर्थक भाऊसाहेब दुधाळ यांनी हा वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम घेतला.
यावेळी विनायक खामकर,माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक सरगर,अरविंद दुधाळ,अरूण सरगर,नामदेव जाणकर,विनायक गोरे,संदीप दुधाळ, रमेश खामकर, माजी उपसंरपच काशीलिंग खामकर,दादासो दुधाळ,शिवाजी झिंजे,सुखदेव जानकर,मनोहर सरगर,रावसाहेब जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Rate Card
डफळापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.