वाळू,मुरूमाची दिवसाढवळ्या चोरी | तालुकाभर रोजरोसपणे तस्कर सक्रीय ; गौण खनिजासाठी समेट झाला काय ?
जत : गौण खनिज चोरट्यांनी आता तालुक्यातील गावागावातील माळरानाला टार्गेट केले असून अनेकांनी चक्क माळराने पोखरून वीस फुटापर्यत खड्डे पाडले आहेत. जत तालुक्यातील विविध गावातील घाटात असे मोठमोठ्ठाले खड्डे दिसत आहे. शासनाची रॉयल्टी बुडवित खुलेआम गौण खनिजाची चोरी सुरू आहे.नव्याने आलेले तहसीलदार गौण खनिज वाहतूकीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आहेत. यामुळे वाळू,मुरूम,दगडाची राजरोस रॉयटी न भरताच चोरी सुरू आहे.
खड्डीसाठी दगड, मुरुम मोठय़ा प्रमाणात खोदला जात आहे. विशेष म्हणजे गौण खनिजाच्या उत्खननासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. रॉयल्टी भरुन उत्खनन करावे लागते. परंतु अत्यल्प रॉयल्टी भरुन मोठय़ा प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जात आहे. अनेकदा बनावट पावत्यांवरही गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. या व्यवसायात अनेक जण गब्बर झाले आहे. विशेष म्हणजे गौण खनिज चोरी करणार्या कंत्राटदारांमध्ये चांगलीच चढाओढ असते.
