चोरीला गेलेल्या दागिण्याचे पैसे परत मिळाले | जत मधील ‘पीएसबी ज्वलर्स’ च्या दागिण्यावरील विमा संरक्षणाचा फायदा
जत,संकेत टाइम्स : जत तालक्यात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या ‘मेसर्स प्रकाश शिवाप्पा बंडगर ज्वेलर्स’ने (पीएसबी) ने दागिने खरेदीवर विमा कवच सुविधेमुळे शहरातील विद्यानगर येथील अंगणवाडी सुपरवायझर दिपाली प्रशांत बुरुड यांना दागिने चोरीला गेल्यानंतर दागिन्यावरील विम्यामुळे दागिण्याची रक्कमेची विमा कंपनीकडून भरपाई मिळाली.जत तालुक्यात प्रथमच‘पीएसबी ज्वेलर्स’ने दागिने खरेदीवर विमा सुरक्षा उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा बुरूड यांना फायदा झाला आहे.अशी सुविधा देणारे प्रकाश बंडगर यांचे तालुक्यातील एकमेव ज्वेलर्सचे शोरुम आहे.
शुध्द,स्वच्छ,प्रशस्त शोरूम,अनेक सुविधा
जत तालुक्यातील ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही सराफ व्यवसायात नाविन्यपुर्ण बदल करून शुध्द,स्वच्छ दागिणे उपलब्ध करून दिले आहेत. आमच्या शोरूममध्ये दसरा,दिवाळीसाठी अनेक योजना सुरू आहेत.जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या प्रशस्त शोरूमला एकवेळ भेट द्यावी.
प्रकाश बंडगर, संचालक