कायद्यांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या निधी कंपनी ग्रामीण बँकिंग क्षेत्राचे भविष्य : सीएस, प्रतिक ढोले | कोल्हापूर येथे निधी परिषद संपन्न
कोल्हापूर : शनिवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे निधी कंपन्यातील संचालक व सदस्य यांना मार्गदर्शन करण्यासाठी निधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध भागातून ६४ निधी कंपनी व त्यांचे संचालक यांनी या परिषदे मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला २२० संचालकांच्या उपस्थितीत निधी परिषद संपन्न झाली.
परिषदे मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनी सचिव सीएस प्रतिक ढोले,यशस्वी उद्योजक शिवाजीराव पवार,डी.व्ही.पी.उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील हे उपस्थित होते.महाराष्ट्रात सहकार क्षेत्रा बरोबरच निधी कंपनी हा वित्तीय तसेच बँकिंग पर्याय म्हणून उदयास येत आहे.यासंदर्भात सीएस प्रतिक ढोले यांनी निधी कंपनीची नोंदणी कशी करावी, नोंदणी प्रक्रिये नंतर कंपनीला कंपनी कायदा २०१३ व निधी नियम २०१४ अंतर्गत कोणत्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात या संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच निधी कंपनी सर्वांगांनी यशस्वी करण्यासाठी ठेवीतील वाढ व कर्ज वाटपा बरोबरच सरकारी फॉर्म,रिटर्न आणि कंम्पायन्स पूर्ण ठेवणे हि अत्यंत निकडीची बाब असल्याचे नमूद केले, त्या संबंधी सखोल मार्गदर्शन केले.
अभिजित पाटील यांनी शून्यातून काही कोटी पर्यत व्यवसाय कसा वादविला यासंबंधी आपले बहुमोल अनुभव कथन केले. उद्योजक होताना धाडस किती महत्वाचे आहे. माणसांची मोट कशी बांधली पाहिजे, वेळ व शब्द पाळणे किती महत्वाचे आहे,असे अनेक पैलू भाषण दरम्यान यावेळी मांडले.मोठे स्वप्न बाळगले पाहिजे व ते सत्यात उतरविलेच पाहिजे व तरुणांनी उद्योजक होण्याचेच ध्येय ठेवले पाहिजे असे ठामपणे पाटील यांनी सांगितले.
शिवाजीराव पवार यांनी अतिशय खुमकदार शैलीमध्ये परिषदेतील सभासदांना सध्याच्या युगातील मार्केटिंगचे नाव नवीन मार्ग सांगितले व ते कसे अमलात आणायचे या संबधी मार्गदर्शन केले. रिषभ खारवटकर, (खंडाळा अर्बन निधी),विक्रमसिंह पाटणकर, (अमेव निधी), कृष्णात पवार,(जीवनकल्याण निधी),मारूती माळी(ब्रम्हा निधी) यांनी नियोजन केले. सहभागी निधी कंपनी आणि त्यांच्या संचालकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कोल्हापूर येथील निधी परिषदेमध्ये सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र स्विकारताना श्री.बुवानंद निधी कंपनीचे चेअरमन राजू माळी