जत : येळवी ता.जत येथील प्राथमिक शिक्षक अण्णासाहेब भोसले यांची कन्या पल्लवी हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वकीलीची पदवी संपादन केली आहे.आज शनिवारी राष्ट्रवादीचे नेते तथा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी त्यांच्या घरी जाऊन तिचा सत्कार करत,शुभेच्छा दिल्या.
आजकाल समाजामध्ये मुलींना शिकवण्याची संधी पालकवर्गातून खूप कमी आहे तसेच बऱ्याच मूला मुलींचा इंजिनियरिंग कडे जास्त ओढ असतो. तरीही अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून भोसले गुरुजी यांचा शिक्षकी पेशा असतानाही त्यांनी आपल्या कन्येला न्याय व विधी क्षेत्र निवडले.त्यामध्ये पल्लवीनेही मन लावून अभ्यास करून चांगले यश संपादन केले. तिने आई वडिलांची इच्छा तर पूर्ण केलीच त्याबरोबरच येळवी गावातून पहिल्यांदा एक कन्या न्याय व विधी कायद्याची पदवी संपादन करते हो आदर्श उभा केला आहे,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,असे यावेळी बोलताना रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले.
जमदाडे यांनी येळवी येथे तिच्या राहते घरी पल्लवी व तिचे आई वडील यांचे अभिनंदन केले व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी,पारलीमेंट्री बोर्डाचे नेते फत्तु नदाफ,जत तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप पवार,जिल्हा उपाध्यक्ष बसवराज यलगार,जिल्हा संपर्क प्रमुख सिकंदर शेख,तालुका सरचिटणीस गांधी चौगुले,शिक्षक संघाचे नेते कृष्णा तेरवे, नेते श्रीशैल मुचंडी,नेते लक्ष्मण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
येळवी ता.जत येथील पल्लवी भोसले हिचा वकीलीची पदवी संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.