तलाठ्याच्या सही,शिक्क्याचे डिजिटल उतारे | शासनाच्या मोहिमेसाठी जत महसूलचा अजब कारभार ; कशाला म्हणायचा डिजिटल उतारा

0

 

जत,संकेत टाइम्स : राज्यातील शेतकऱ्यास देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.७/१२ उताऱ्याची प्रत उपलब्ध करून देण्याची सुरूवात शनिवार ता.२ ऑक्टोंबर गांधी जंयतीपासून जत तालुक्यात करण्यात आली,मात्र डिजीटल उतारे देण्याऐवजी तलाठ्याचा शिक्का,सही मारलेले उत्तारे आंवढीसह तालुक्यातील अनेक गावात देण्यात आल्याने जत महसूल विभागाच्या गलथान कारभाराबद्दल शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहेत.

महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेत म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला होती.त्यानुसार शासन निर्णयान्वये अद्ययावत करण्यात आलेला गा.न.नं.७/१२ चा उतारा सर्व संबंधितांना समजण्यासाठी अधिक सोपा करण्यात आलेला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त डिजीटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमि अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.७/१२ अद्यावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या उद्देशाने विशेष मोहिमेचा शुंभारभ ता.२ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पासून सुरू करण्यात आला आहे.उताऱ्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी येणारा खर्च हा जिल्हा सेतू समितीकडील निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मात्र जत तालुक्यात महसूल विभागाचा‌ बट्याघोळ पुन्हा चव्हाट्यावर आला असून तालुक्यातील काही बोटावर मोजण्याऐवढ्या गावातच डिजिटल उत्तारे वाटण्यात आले आहेत.अन्य गावात तलाठ्याच्या लँपटॉप वरील उताऱ्यांची प्रत काढून त्यावर तलाठ्याचा शिक्का मारून डिजिटल उतारे वाटण्याचे फक्त फोटो सेशन करण्यात आले आहे.

 

 

Rate Card

मिकळत नसल्याने हालगर्जीपणा

जत,संख तहसील कार्यालयातील हालगर्जीपणा नविन नाही,दलालराज,टेबलखालून पैसे,गौण खनिज तस्करांना अधिकाऱ्यांचे वरदान,नविन अधिकाऱ्यांचे जंगी सत्कार सोहळे,मिकळकतीवर डोळा यावर यापुर्वी सातत्याने आरोप झाले आहेत.आता त्यापुढे जात जतच्या तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या गावात डिजीटल उताऱ्यांची मोहिम राबविण्यासाठी थेट तलाठ्याचे सही सिक्के मारून गावातील चार-पाच नेत्यांना डिजिटल उतारे म्हणून वाटून अकलेचे तारे तोडले आहेत.विशेष म्हणजे या वाटपाचे फोटो काढून सोशल मिडियावर टाकत आम्ही मोहिम राबविल्याचा गाजावाजा करण्यात आला आहे.

 

प्रत्यक्षात डिजिटल कशाला म्हणायचे ?

डिजिटल उतारे कशाला म्हणायचे हे जत अधिकारी,मंडल अधिकारी तलाठ्यांना माहिती नसेलतर शेतकऱ्यांना कसे कळणार,जतचे तहसीलदार यांनी जत तालुक्यात डिजिटल उतारे घरपोच मोहिम वरिल आदेशावरून राबविली खरी मात्र डिजिटल उतारे देण्याऐवजी तलाठ्याच्या सही सिक्के मारलेले उतारे मारून फोटो सेशन केले आहे.

 

शासन आदेशासाठी घाई गडबड

शासनाने अद्यावत डिजिटल ७/१२ उतारे शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहचविण्याचे आदेश काढले होते.त्यामुळे घाई गडबडीने मोहिमेचा शुभारंभ महात्मा गांधी जयंती पासून करण्यात आला.मात्र सर्व्हर डॉऊन असल्याचे कारण सांगत सर्वत्र सही शिक्क्याचे उतारे वाटण्यात आले आहेत.

 

आंवढी ता.जत येथे तलाठ्याची सही,सिक्का असलेले उतारे बोटावर मोजण्याऐवढ्या नेत्यांना वाटून डिजिटल उतारे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.