उमदी नजिक बोर नदीत एक महिला वाहून गेली

0
उमदी,संकेत टाइम्स : उमदी ता.जत येथील बोर नदी पात्रातून विवाहित महिला वाहून गेल्याची दुर्देवी घटना सोमवारी घडली आहे.सोनाली तुकाराम कांबळे (वय २६,रा.उमदी) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. रात्री उशिरापर्यत या महिलेचा शोध लागलेला नव्हता.याप्रकरणी उमदी पोलीसांनी सर्वत्र शोधाशोध केली आहे.
अधिक माहिती अशी, सोनाली कांबळे ह्या सोमवारी सकाळी बोर नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या पावसामुळे बोर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.त्यात सोनालीचा पाय घसरून पडल्याने वाहून गेल्या आहे.विशेष म्हणजे सोनाली या दोन्ही पायाने अंपग आहेत.त्यांच्या पतीचे दोन वर्षापुर्वी निधन झाले आहे.त्यांना दोन मुले आहेत.त्याचा पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री उशिरापर्यत त्यांचा शोध लागलेला नाही.या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.