मोरबगीतील संगणक परिचालकांस मारहाण | तात्काळ कारवाई करा,संघटनेचे बीडीओना निवेदन 

0
वळसंग, संकेत टाइम्स : मोरबगी ता.जत येथील संगणक परिचालक प्रशांत सोनकनळळी यांना २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती दिवशी मारहाण करून त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता ही जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे.असे कृत्य करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.  
निवेदनात म्हटले आहे कि,गावातील बसवंतराय बगली नामक व्यक्तीने सप्टेंबर महिन्यात आपल्या जागेच्या मोजणीसाठी अर्ज केला होता, मासिक मिटिंग वेळी गावात उपस्थित नसल्याने विषय प्रलंबित होता तद्नंतर २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून उपस्थित सदस्य वर्ग यांच्या समोर सदर विषयावर चर्चा भरवली गेली.संगणक परिचालक
सोनकनळळी यांनी दप्तरी सेवा पूर्ण केलेनंतर बाचाबाची झाली व अंगावर धावून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर प्रशांत यांच्या गावातून घराकडे जाणारा रस्ताही जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतपणे खोदून रस्ता अडवला आहे.त्यानंतर निगडित पोलीस ठाणेमध्ये बगली व प्रशांत यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.शासकीस काम करणारे संगणक परिचालक प्रंशात सोनकनळळी यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून निवेदन दिल्याचे कल्लाप्पा कोळी यांनी सांगितले.विजय नगराळे,प्रशांत सोनकनळळी,नारायण भोसले,अंदानी, नितीनकुमार,रुपाली लोहार,आदी  केंद्रचालक उपस्थित होते.
मोरबगी ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक प्रंशात सोनकनळळी यांना कोणतेही कारण नसताना गंभीर मारहाण करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या घराकडे‌ जाणारा कायमचा रस्ता खोदून बंद करून मोठा अन्याय केला आहे. त्यांना तातडीने न्याय मिळावा अन्यथा आमरण उपोषण करू असा,इशारा संघटेनेचे अध्यक्ष कल्लाप्पा कोळी यांनी दिला आहे.
Attachments area
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.