माडग्याळ ग्रामीण रुग्णालयचं आजारी | डॉक्टरसह महत्वाची पदे रिक्त ; नागरिकांना घ्यावा लागतोय खाजगीचा आधार

0
माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त पदामुळे आजारी पडले आहे.येथे तातडीने डॉक्टरांसह,रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे.जत तालुक्यातील पुर्व भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी माडग्याळ येथे अनेक कोटी रूपये खर्चून भव्यदिव्य असे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे.मात्र गेल्या अनेक दिवसापासून येथील प्रमुख अधिक्षक पदासह डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.

 

 

अधिपरिचारिकासह काही पदासाठी सहा महिन्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचा कालावधी लवकरचं संपणार आहे.पुर्णवेळ सफाई कामगार नाहीत,विशेष म्हणजे एक्स-रे मशीन आहे.मात्र त्यासाठी टेक्निकल पद रिक्त असल्याने मशीन धुळखात पडून आहे.त्याशिवाय अन्य मशीनरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.मात्र त्या चालविण्यासाठी अनुभवी डॉक्टर्स,कर्मचारी नाहीत.त्याशिवाय औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागत असल्याने आर्थिक भुर्दड सोसावा आहे.प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांचा वणवा आहे,तेथे‌ सर्जनचा विचार न केलेला बरा अशी भहवाह परिस्थिती आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हे रुग्णालय फेल ठरले असून नुसती सुसज्ज इमारत बघून रुग्णांना बरे होण्याची वेळ आली आहे.
Rate Card
राजकीय उदाशीनता
जत तालुक्यात सत्ताधारी महाआघाडी,विरोधी पक्षाचे अनेक दमदार नेते,समाजसुधारक आहेत.अनेक विषयावर त्यांच्या कडून निवेदन, आंदोलने होतात.मात्र लाखो नागरिकांच्या आरोग्याचा कणा असलेल्या माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाची अवस्था त्यांना दिसत नाही,किंबहुना ते जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने शासकीय आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.