वाळू तस्करांना रान मोकळे | तीन नवे अधिकारी कधी होणार सक्रीय ; गत पंधरवड्यात तस्करी दुप्पट
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात वाळू तस्करांनी धुडगूस घातला असून काही राजकीय नेत्याबरोबर फोटो काढणारे फंटर तस्करांनी महसूल यंत्रणेला दास बनविल्याने या तस्करांना रोकणार कोन असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे जतच्या लगतच्या मंगळवेढा तालुक्याचे तहसिलदारांनी वाळू तस्करांना सळो की पळो करून सोडले असून दंडात्मक कारवाईच्या भितीमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.तशी कारवाई जत तालुक्यात कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जत,संख अशी दोन तहसील कार्यालये वाळू तस्करी रोकण्यात अपयशी ठरले असून नव्याने अधिकाऱ्यांचा वेळ सत्कार स्विकारण्यात जात असल्याने तस्करांना रोकण्यात त्यांची उदाशीनता स्पष्ट झाली आहे.तालुक्याच्या शेजारील असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचे तहसिलदार स्वप्निल रावडे यानी विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांची नाकेबंदी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे.मंगळवेढा शहरासह तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी नविन बांधकामे सुरू आहेत.अशा ठिकाणी वाळूचे साठे करणारे बांधकाम मालक किंवा ठेकेदार यांच्याकडून वाळू परवाना घेतला आहे का? याची पथकामार्फत चौकशी चालू केली असून जर त्यांच्याकडे वाळू परवाना नसेल तर अशा बांधकाम करणारे मालक किंवा ठेकेदार यांना प्रतिब्रास ४० हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईचा धसका वाळूतस्करानी घेतला असल्याने तस्करांनी धसका घेतल्याने वाळू तस्करी रोकण्यात मोठे यश मिळविले आहे.दुसरीकडे तस्करांचे मोठे जाळे असलेल्या जत तहसील व संख अप्पर तहसील कार्यालय हद्दीत वाळू तस्करांचे भांडारे असून कोरडा व बोर नदीचे वाळू तस्कर दिवसा ढवळ्या लचके तोडत आहेत.त्याला रोकण्याची जबाबदारी असलेले तहसीलदार जीवन बनसोडे,अप्पर तहसीलदार एस.आर.मागाडे यांच्याकडून तस्करांना पायबंद बसेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी पदभार घेतल्यापासून वाळू तस्करी दुप्पट वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी असलेले नव्याने आलेले प्रांताधिकारी जोंगेद्र कट्यारे यांचे हाताची घडी तोंडावर बोट भूमिका संशय बळावणारी असल्याचे आरोप होत आहेत.जत शहरासह गावागावातील बांधकामासमोरील वाळू ढिगारे त्यांच्या अपयशाची उदाहरणे आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनीच आता जत तालुक्यात लक्ष घालावे,अशी मागणी होत आहेत.
जत शहरासह गावागावातील बांधकामे व वाळूचे ढिगारे नव्या अधिकाऱ्यांना दिसत नसतील तर नवल आहे.