सोन्याळ- उटगीनजिक दुचाकीचा अपघात,दोघे जखमी

0

जत,संकेत टाइम्स : सोन्याळ ते उटगी दरम्यान दुचाकीच्या‌ समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.उमदी येथील मधू सुरगोंड,व कदम(पुर्ण नाव समजू शकले नाही) असे दोघे जखमी झाले आहेत.

 

Rate Card

अधिक माहिती अशी,मधू सुरगोंड व कदम हे माडग्याळहून उमदीकडे दुचाकीवरून जात होते.दरम्यान सोन्याळ ते उटगी नजिकच्या पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकीला मधू सुरगोंड व कदम यांची दुचाकीची धडक झाल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उमदी पोलीसांनी त्यांना वाहनातून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांची प्रकृत्ती बिघडल्याने त्यांना सांगली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.