बसरगीनजिक एकाला लुटले,३५ हजाराचा मुद्देमाल लंपास

0
जत,संकेत टाइम्स : जत-अथणी रस्ता लुटमारीचा अड्डा बनला आहे,या रस्त्यावर दररोज लुटीच्या घटना घडत आहेत.नुकतेच बिळूरहून गुगवाडकडे चाललेल्या शिवगोंडा बसगोंडा चौगुले(वय ३३,रा.गुगवाड) या युवा शेतकऱ्यांला बसरगी नजिक तिघा चोरट्यांनी अडवून खिशातील पैसे मोबाईल असा ३५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी,सिंदगोंडा चौगुले बिळूर येथून शेतमालाचे पैसे घेऊन रविवारी रात्री दहाच्या सुमारास गुगवाडकडे निघाले होते.बसरगी विजबोर्ड जवळ पांढऱ्या दुचाकीवरून आलेल्या काळे जॉकेट घातलेल्या तिघां चोरट्यांनी त्यांच्या आडवी दुचाकी लावत थांबविले.चोरट्यांनी चौगुले यांची दुचाकी काढून घेत‌ खिशातील रोख तीस हजार व ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा ३५ हजाराचा मुद्देमाल काढून घेत पांढऱ्या दुचाकीवरून पसार झाले.तेवढ्यात पाठीमागून चौगुलेचा मित्र बसवराज बाळाण्णा कोंकणे आले.
कन्नड बोलणारे २० ते २२ वर्षाचे हे तिघे तरूण चोरटे असल्याचे सिंदगोंडा चौगुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.