माडग्याळमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी ; रिपाइंची मागणी
माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथे सविंधानचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी दलित पँथर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. तशा मागणीचे निवेदन संरपच अप्पू जत्ती यांना देण्यात आले आहे.
देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी न्याय मिळवून दिला, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली.ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले.आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो,असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भावी पिडीला समजावे, त्यासाठी प्रशस्त उद्यान उभारण्याचा मानस आमचा आहे, ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे सर यांनी केली आहे.
यावेळी रिपाइंचे विधानसभा अध्यक्ष राकेश कांबळे,दलित पँथरचे विकी वाघमारे,आदी मान्यवर उपस्थित होते.
माडग्याळ ता.जत येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.