गडीनाड भागातील कन्नड शाळाच्या सोईसुविधासाठी निधी द्यावा | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे रवीपाटील यांची मागणी

0
माडग्याळ, संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गडीनाड भागातील कन्नड शाळाच्या सोईसुविधा साठी निधी द्यावा, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेत जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवीपाटील यांनी केली आहे.जत‌ पुर्व भागात मोठ्या प्रमाणात कन्नड शाळा आहे,या भागात मोठ्या प्रमाणात कन्नड भाषिक नागरिक राहत आहेत.त्या शाळांत अत्याधुनिक सोयी-सुविधां देण्याची गरज आहे.
त्यासाठी कर्नाटक राज्याच्या सिमांना लागून असलेल्या या गडीनाड भागातील शाळातील कन्नड शाळासाठी निधी द्यावा,अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे केली.दरम्यान मुख्यमंत्री बोम्माई यांनी यासंदर्भात तात्काळ कारवाई करून निधी उपलब्ध करून देण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्याचे रवि पाटील यांनी दिली.यावेळी बेळगावचे राज्यसभा सदस्य खासदार ईरांना कडाडी व पदाधिकारी उपस्थित होते.
Rate Card
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना कन्नड शाळांतील सुविधाबाबत चर्चा करताना जि.प.सदस्य तम्मणगौडा रवीपाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.