डफळापूर नजिकच्या अपघातात स्वस्तधान्य दुकानदारांचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी

0
डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर येथे ट्रँक्टर ट्रॉली व दुचाकीच्या झालेल्या अपघातात डफळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाला.घटना सायकांळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.
अशोक भूपाल चव्हाण (वय ६२) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.यात त्यांच्या पत्नीही गंभीर जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी जत पोलीसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
अधिक माहिती अशी, अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी कोकळे नजिकच्या शेतातून कोकळे- डफळापूर रस्त्याने डफळापूर कडे येत होते.लिलिपुट शाळे नजिक समोरील वाहन आल्याने त्यांनी दुचाकी बाजूला घेत असताना समोर उभ्या असलेल्या ट्रँक्टरच्या ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची धडक झाली.त्यात त्यांना व पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

 

 

दोघांना तात्काळ मिरज येथे उपचार्थ दाखल केले मात्र चव्हाण यांचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान स्वस्त धान्य विक्रेते असलेले चव्हाण यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.