निधी बँका ; NDH-३ (सप्टेंबर २०२१) भरण्याची माहिती व सुचना
निधी संचालन | NDH-३
आपल्याला माहीत आहेच की निधी नियम २०१४/२०१९ मधील नियम २१ प्रमाणे प्रत्येक निधी कंपनी ला अर्ध वार्षिक *NDH-३ रिटर्न* भरायचे असते. आत्ताच आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील पाहिले अर्ध वर्ष *एप्रिल ते सप्टेंबर २०२१* संपले.
NDH-३ रिटर्न भरण्याची शेवटची तारीख दि. ३० ऑक्टोबर २०२१ आहे.
NDH-३ भरताना खालील काळजी घ्या –
१. NDH-३ मध्ये सभासद यादी, ठेवीदारांची वेगवेगळी यादी (सेविंग, FD, RD), कर्जदरांची तारण प्रमाणे वेगवेगळी यादी, अव्याप्त मुदत ठेव (Unencumbered Term Deposit) या सर्वांचा मागील *एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत* चा पूर्ण तपशील जातो.
२. यासाठी आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सर्व एन्ट्री झालेले असल्याची खात्री करून घ्या. सॉफ्टवेअर मध्ये सर्व सभासदांचे KYC घेतले आहेत की नाही ते पण खात्री करून घ्या.
३. आपण NDH-३ मध्ये भरत असलेला तपशील आपल्या CA कडून तपासून घ्या. कारण पुढे ऑडिट साठी ह्या तपशील मध्ये बदल होऊ शकणार नाही.
