दलितवस्ती विकासासाठी दोन कोटीचा निधी उपलब्ध ; आ.विक्रमसिंह सांवत | हायमास्ट,पेविंग ब्लॉक,गटारीची कामे होणार
जत,संकेत टाइम्स : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत जत तालुक्यासाठी दोन कोटी सात लाख रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.संख येथील शेतकरी मेळाव्यात राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तालुक्याला हा निधी देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार अगदी पंधरा दिवसात हा निधी तालुक्याला प्राप्त झाला आहे.यातून दलित वस्तीतील हायमास्ट,पेविग ब्लॉक,गटारी,क्राकीट रस्ते,पाण्याची टीका अशी कामे करण्यात येणार आहेत.
जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या विकास कामाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.
निधी मंजूर झालेल्या गावांची नावे : डफळापूर ८ लाख,अक्कळवाडी ६ लाख, गुळवंची ५ लाख, मल्लाळ ७ लाख, अंकलगी ७ लाख, मोटेवाडी ७ लाख, मायथळ ८ लाख , कुंभारी ७ लाख, शिंगनहळ्ळी ३ लाख, बोर्गी ७ लाख , कुडणुर ७ लाख , व्हसपेठ ७ लाख, लकडेवाडी ७ लाख, दरीबडची ७ लाख , गोंधळेवाडी ८लाख , हळ्ळी ८ लाख, माडग्याळ ८ लाख, उमदी ८ लाख , पांढरेवाडी ८ लाख, गुड्डापुर ८ लाख, दरीबडची ८ लाख, तिकोंडी ७ लाख, सोरडी ७ लाख, प्रतापुर ३लाख, मिरवाड ८ लाख, मोटेवाडी ८ लाख, सुसलाद ११ लाख असा दोन कोटी सात लाखाचा निधी तालुक्याला प्राप्त झाला आहे.
विकास कामांना प्राधान्य ; आ.सावंतजत तालुक्यातील गावागावातील वसाहती,तांडे,वाड्यावस्त्याच्या विकास व्हावा,यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.गावांच्या विकासाबरोबर नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध विकास निधीतून कामे आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.
