जेष्ठ नेते गंगाधर मोरडी यांचे निधन

0

दरीबडची : दरिबडची ता.जत येथील जेष्ठ नेते गंगाधर राम गुंडा मोरडी यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते दरिबडची परिसरातील मोठे नेते होते.दरिबडचीचे सरपंच,जत पंचायत समितीचे सदस्य व सांगली मार्केट कमिटीचे संचालक अशी पदे त्यांनी भूषविली आहेत.‌

Rate Card
सर्व सेवा सोसायटी व दरिबडची ग्रामपंचायतीची दिर्घकाळ सत्ता त्यांच्या गटाकडे आहे.सध्या त्यांच्या पत्नी संरपच आहेत.

सर्वांशी मनमिळावू,ग्रामस्थाच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणे,तालुका स्तरीय नेत्याशी असलेले निकटचे संबध यामुळे त्यांनी गावात अनेक विकास योजना आणून प्रभावी काम केले आहे.गावात शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी मुलांच्या माध्यमिक व ज्यूनिअर कॉलेजची सोय केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.