जतेतील चोरीप्रकरणी अंबरनाथ येथील एकास पकडले | जत पोलीसांची कामगिरी | तिन्ही घटनातील फिर्यादीने संशयिताला ओळखले

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर झालेल्या दोन व महाराणा प्रताप चौक येथील एक या तीन्ही चोरीतील संशयिताला जत पोलीसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण श्रीनिवास अकलू (वय २५,रा.अंबरनाथ,ता.कल्याण जि.ठाणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.तिन्ही घटनातील फिर्यादीने संशयिताला ओळखले आहे.मात्र संशयित काही माहिती देत नसल्याने तपास करण्याचे मोठे आवाहन पोलीसासमोर आहे.दरम्यान त्याला जत न्यायालयात उभे केले असता मंगळवार १२ ऑक्टोंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Rate Card

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, १९ संप्टेबरला सिध्दनाथ (ता.जत) येथील शेतकरी संभाजी लकाप्पा चौगुले यांनी जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून काढलेले शेतमालाचे पावनेचार ‌लाख रूपये,२३ संप्टेबरला जत शहरातील विठोबा आप्पा साळे यांचे  बँकेतून काढलेले ५० हजार स्टेट बँकेसमोरील भाजीपाला बाजारातून तर २७ संप्टेबरला अचनहळ्ळी येथील मोहसीन ‌मणेर यांचे महाराणा प्रताप चौकातून दिड लाख अशा तीन घटनात पावनेसहा लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले होते.आठवड्यात घडलेल्या तिन्ही चोरीचा छडा लावण्याचे मोठे आवाहन पोलीसासमोर होते.पोलीस निरिक्षक उदय डुबुल यांनी अनुभव पणाला लावत चोरीच्या मंगळवार व शुक्रवारी अशा घडलेल्या घटनाच्या आधारे शुक्रवारी बँक व शहरातील काही चौकात सिव्हिल ड्रेसमध्ये सापळा लावला होता.

 

त्यात संशयित लक्ष्मण अकलू हा संशयास्पद फिरताना आढळून आला. त्याला सतर्क नागरिक भिमाशंकर लोणी व पोलीसांनी हाटकले मात्र त्यांने तेथून पळ काढला.पोलीसांनी त्याचा पाटलाग करून त्याला ताब्यात घेतले.दरम्यान पळताना संशयित अकलू पडल्याने त्यांच्या पायास दुखापत झाली आहे.दरम्यान पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत. मात्र तो वेगवेगळी माहिती देत असल्याने चोऱ्यांचा शोध लावणे जिकीरीचे बनले आहेत.मात्र तिन्ही घटनेतील फिर्यादीने संशयितला ओळखले आहे.संशयिताचे साथीदार व मुद्देमाल अन्य घटनाचा शोध‌ लावण्याचे पोलीसासमोर आवाहन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.