पालकमंत्री जयंत पाटील जतच्या जनतेची फसवणूक करत आहेत ; संजय कांबळे यांचा आरोप | बुधवारी रिपाइंचा संखमध्ये‌ मेळावा

0
जत,संकेत टाइम्स : जत पुर्व भागातील जनतेची जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील फसवणूक करत आहेत.विस्तारित योजनेसाठी पाणी देण्याचा कोणताही जीआर नसताना ते कसे व कोठून पाणी देणार आहेत,हे स्पष्ट करावे,असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केले.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावांना म्हैशाळचे पाणी मिळाले पाहिजे या मागणीसह अन्य विविध मागण्या संदर्भात बुधवार दि.१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बाबा महाराज मंगल कार्यालय संख (ता.जत) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जत तालुक्याच्या वतीने भव्य मेळावा आयोजित केला,असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कांबळे पुढे म्हणाले की, जत तालुक्यातील पूर्व भाग हा नेहमी दुष्काळी भाग आहे. या भागातील 64 गावे हे पूर्णपणे
Rate Card
पाण्यापासून वंचित आहेत.

 

येथील शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. म्हणून आम्ही आरपीआयच्या वतीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले आहे. तसेच जत तालुक्यातील व शेतकऱ्यांच्या हक्कांचा २० हजार सभासदांचा कारखाना मंत्री जयंत पाटील यांनी विकत घेतला आहे. तो कारखाना परत शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे. जर तुम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित जोपासत असाल तर तो कारखाना सभासदांच्या नावे करावा.फक्त राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही जत तालुक्यात दौरे व मेळावे घेत आहात. परंतु या तालुक्याचे सुख दुःख तुम्हाला नाही,जरी आमचा पक्ष मोठा नसला तरी आम्ही कायम तालुक्याच्या हितासाठी लढत असतो.जत कारखाना सभासदांना मिळालाच पाहिजे,तालुक्याला पाणी हे मिळालेच पाहिजे हि आमची ठाम भूमिका आहे. मंत्री जयंत पाटील यांना आवाहन आहे कि, जत तालुक्याला किती टीएमसी व कुठून पाणी देणार याचा त्यांनी आम्हाला जीआर दाखवावा.शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बंद करा असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास कांबळे, शंकर वाघमारे सर, विलास बाबर, किशोर चव्हाण, विनोद कांबळे, विलास
साबळे, प्रा.हेमंत चौगुले,संजय कांबळेपाटील, प्रशांत ऐदाळे,बादल कांबळे, राम नरहट्टी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.