उत्तरप्रदेश घटनेच्या निषेधार्थ सोमवारी बंदची हाक

0
जत : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय‌मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण‌ देशभरात सर्व स्तरातून तिव्र निषेध करण्यात येत‌ आहे.या घटनेच्या निषेधार्थ सोमवार ११ ऑक्टोंबरला महाविकास आघाडी कडून महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. जत तालुक्यातील व्यवसायिक, नागरिकांनी त्याला पांठिबा देण्यासाठी बंद पाळावा,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

 

Rate Card
आमदार सांवत म्हणाले,शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने गाडी घालून चिरडले त्यामध्ये आठ शेतकऱ्याचा मृत्यू झाला.त्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण पसरले असून, या घटनेचा निषेध म्हणून सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर‌ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद‌ पाळण्यात येणार आहे. यावेळी जत तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व व्यापारी संघटनांनी या बंद मध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यात यावे, असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, शिवसेनेचे बंटी दुधाळ,रफिक शेख,सलीम पाच्छापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.