दुर्देवी घटना | भाऊ-बहिणीचा तलावात बुडून मृत्यू | जत‌ तालुक्यातील घटना

0
जत,संकेत टाइम्स : उमराणी ता.जत येथे तलावात बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.सावित्री बाबू यादव (वय १४),अभिजीत बाबू यादव (वय १२) अशी मयत दोघाची नावे आहेत.

 

 

अधिक माहिती अशी,सावित्री यादव ही आठवीच्या वर्गात शिकत होती तर अभिजीत यादव हा सहावीत शिकत होता.रविवार असल्याने दोघेजण सिंदूर रस्त्यावरील दिग्विजय डफळे यांच्या शेतातील तलावात आईला धुणी धुण्यासाठी मदत करण्यासाठी दोघे भाऊ-बहिण गेले होते.दरम्यान सावित्री तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागली.तिला वाचविण्यासाठी अभिजीत गेला,त्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

 

 

 

Rate Card
या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जत तालुक्यात महिन्याभरात अशा घटना वाढल्या आहेत.गत महिन्यात पाण्यात बुडून मृत्यूच्या चार घटना घडल्या आहेत.उमदीत बहिण भाऊ,सोनलगीत दिंव्याग महिला,उमराणीत यापुर्वी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.