जत,संकेत टाइम्स : जत शहरात बेकायदेशीर शस्ञ बाळगल्या प्रकरणी एकास झायलो चारचाकी गाडीसह पोलीसांनी ताब्यात घेतले.प्रथमेस सिध्दराया मिणचेकर रा.जत असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पो.कॉ.संतोष कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शहरातील जत- चडचडण रोडवर बाळगोपाल हॉस्पिटल समोर संशयित प्रथमेस मिणचेकर झायलो (एमएच १०,बीके ४६१०) सह संशयास्पद उभा असल्याने पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी करत झायलोची तपासणी केली.त्यात धारदार तलवार आढळून आली आहे. बेकादेशीर शस्ञ बाळगणे अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.