अनेक तलाठ्याचा ठिय्या जतेत | शेतकरी,नागरिकांचे बेहाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभयं,का दुर्लक्ष

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात महसूली काम करणारे अनेक गावचे तलाठी,मंडल अधिकारी थेट जतमध्ये ठिय्या मांडून कामकाज पाहत आहेत.त्यामुळे तालुक्यात गावागावातील शेतकरी,नागरिकांना जतमध्ये सातबारे,दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.तालुक्यातील अनेक गावात तलाठी गावात येत नाहीत म्हणून अनेक तक्रारी देऊनही तलाठ्याचा जतच्या तलाठी भवनमधील ठिय्या कुणाच्या अभयांमुळे वाढला आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 

जतचे नवे तहसीलदार हे चित्र बदलवणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जत तालुक्यात महसूलच्या कोतवाल, तलाठी,मंडल अधिकारी व तेथून पुढे तहसील कार्यालय,उपविभागीय कार्यालयात साध्या कामासाठीही शेतकऱ्यांना नागविण्याचे प्रकार राजरोसपणे होत आहे. यावर कोणताही नेता बोलत नसल्याने सर्व यंत्रणा मुजोर झाली असून कोन किती लुटायचे यासाठी अतर्गंत स्पर्धा सुरू आहे.

 

 

जत तालुक्याच्या मोठा विस्तारामुळे निम्यावर गावे पन्नास,पन्नास किलोमीटर अंतरावर आहेत. अशा अनेक लांब पल्याच्या गावातील तलाठी काही महिन्यापासून गावाकडे फिरकला नसल्याचे वास्तव आहे.त्याबाबत तेथील नागरिकांनी वारवांर तहसीलदार,प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यापर्यत तक्रारी करूनही अनेक तलाठी,मंडल अधिकारी नेमणूकीच्या गावाकडे फिरकलेले नाहीत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या‌ अभयांमुळे ते मुर्दाड झाले असून ते थेट जत किंवा जवळच्या मोठ्या गावातूनच कारभार पाहत आहेत.विशेष म्हणजे यामुळे शेतकरी,नागरिकांचे आर्थिक शोषण करण्याचा प्रकार जत तालुक्यात अनेक दिवसापासून सुरू आहे. त्याला रोकून तलाठ्यांना नेमलेल्या नावात उपस्थित राहण्यासाठी कारवाईचे शिवधनुष्य तहसीलदारांना उचलावे लागणार आहे.

 

 

अनेक सातबारावरील नावे,क्षेत्र चुकले
जत तालुक्यात ऑनलाइन सातबाराच्या‌ नावाखाली हाजारो शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील नावे,क्षेत्र,आनेवारीतील नावे चुकविण्यात आली आहेत.अशा चुका झालेले दररोज २५ वर शेतकरी संबधित कंपनी,महसूलच्या चुका दुरूस्तीसाठी जत तहसील कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. विशेष म्हणजे यातील बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांची कामे होता,अन्य जण रिकाम्या हाताने परततं आहेत.
Rate Card

 

 

अनेक गावचे कोतवालाचा तहसील कार्यालयात तळ
जत तालुक्यातील अनेक गावात कोतवालाची नेमणूक करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यातून त्यावेळी कुठल्याही गावचा कोतवाल कुठेही नेमण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गावात नेमका कोतवाल कोन आहे हेही नागरिकांना माहिती नाही.तर वीसपेक्षा जास्त कोतवाल जत तहसील कार्यालयात ठाण मांडून आहेत.विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील महत्वाच्या टेबलचा कार्यभार ते चालवत असल्याचा गंभीर प्रकार जतेत अनेक वर्षापासून सुरू आहे. अशा कोतवालांना मुळ नेमणूकीच्या ठिकाणी हलविण्याचे काम नवे तहसीलदार करणार का?पुन्हा मागे तसे पुढे चालणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जत तहसील कार्यालय

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.