खलाटीनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी

0

 

जत : जत तालुक्यातील जत-सांगली मार्गावर टी फाट्यानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. हणमंत आप्पासो तेली (रा.डफळापूर वय ३५), निभानी पिराप्पा लोखंडे (वय ५०, रा. निभाळ, ता. इंडी,जि. विजापूर) व बनशिर मामू एडके(वय ४०, रा. बेगनाळ, ता. इंडी) अशी जखमींची नावे आहेत.

 

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की हणमंत तेली हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १०,व्ही १७३३) जत-सांगली मार्गावरून खलाटी मार्गे जात होते. यावेळी समोरुन विनानंबरच्या दुचाकीवरून निभानी लोखंडे व बनशिर एडके आले.

 

 

Rate Card

खलाटी फाट्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघांना गंभीर इजा झाली. त्यांना सांगलीला उपचारासाठी हलविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.